आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:११२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

अणदूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जवाहर विद्यालयात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. जवाहर विद्यालय, श्री श्री रविशंकर विद्यालय, संत विनोबा भावे विद्यालय, खुदावाडी या शाळांचे एकूण ११९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

त्यापैकी ११२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रविवारी (दि.३१) झालेल्या या परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून विठ्ठल जाधवर, सहकेंद्र संचालक म्हणून लिंबाजी सुरवसे यांनी तसेच बैठे पथकप्रमुख तानाजी गायकवाड, धर्मराज भोसले, संगीता घुगे यांनी परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी सहकार्य केले. या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून लक्ष्मण बारगळ, सिद्धार्थ कांबळे, महादेव स्वामी, नदाफ, आदरवाड यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...