आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात ऑगस्टच्या सहाव्या दिवशी १२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मागील दोन महिन्यात २५२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर २५२ जण कोरोनामुक्त झाले. या काळात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑगस्टच्या सहा दिवसांत ५७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या ३५ रुग्ण उपचारात आहेत. चौथ्या लाटेत जूनपासून आतापर्यंत ३०९ पॉझिटिव्ह आढळले असून २७३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ८८.३५ टक्के तर मृत्यूचा दर ०.३२ टक्क्यावर आहे. उपचारात ११.३३ टक्के रुग्ण आहेत. चौथ्या लाटेत जूनच्या नवव्या दिवशी एक जण पॉझिटिव्ह आले होते. आतापर्यंत तालुक्यात ३०९ पॉझिटिव्ह व एक मृत्यू झाला आहे. २७३ जण कोरोनामुक्त झालेत. ३५ रुग्णांवर उपचार व गृहविलगीकरणात आहेत. जुलैमध्ये २५२ जण पॉझिटिव्ह, तर एक मृत्यू झाला. ऑगस्टच्या सहाव्या दिवशी १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी उपजिल्हा रुग्णालय, मुरुम ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागामार्फत ९२ अँटीजेन चाचणीत सहा तर ९२ स्वॅब अहवालात सहा असे १२ पॉझिटिव्ह आढळले. शहरात काळे प्लॉट, मुन्शी प्लॉट, गौतम नगर, बडवे चावल येथे प्रत्येकी एक तर ग्रामीण भागात एकोंडीवाडी, वागदरी, पळसगावतांडा, तुरोरी, हंद्राळ, चंडकाळ, चिंचोली, बेडगा येथे प्रत्येकी एक असे १२ पॉझिटिव्ह आढळले. जूनपासून शहरात १३२ जण, ग्रामीण भागात १७७ पॉझिटिव्ह आढळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.