आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान:16 दिवसांत 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उमरगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. उमरगा तालुक्यात मागील १६ दिवसात १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

जून महिन्यात मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात ९ तारखेला एक, १३ जूनला जकेकूर येथे एक, १४ जूनला मुरुम येथे एक, १५ जून रोजी शहरात एक, ग्रामीण भागात एक, १७ जूनला ३ असे एकूण ८ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी (दि.२२) १३४ स्वॅब अहवालातून चार पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात एसटी कॉलनीत एक, ग्रामीण भागात कदमापूर, वडगाव व मुरूम येथे प्रत्येकी एक असे चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील १६ दिवसात १२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या पाच रुग्ण उपचारात आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.