आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षांपासून होतोय त्रास:12 उड्डाणपुलांचे काम अर्धवट, हायवेवर खड्डे; शिवसेनेने दोन टोलनाके पाडले बंद

उमरगा / नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १० वर्षांपासून रखडत सुरू आहे. सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. मात्र, ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत येथे टोल वसूली करण्यात येत होती. वारंवार मागणी करूनही काम पूर्ण केले जात नसल्यामुळे संतप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने टोल बंद आंदोलन करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी, उमरगा तालुक्यातील तलमोड येथील टोल वसुली यंत्रणा रविवारी शिवसैनिकांनी उग्र निदर्शने करत बंद पाडली.

ठाकरे गट शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ३१ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम करून महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करावी, यासाठी टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत सांगितले होते. मात्र, दिलेल्या आवाश्वासनाप्रमाणे काम न केल्याने तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी टोलनाक्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने टोल बंद आंदोलन करून वाहनांना तसेच सोडण्यात आले.

खासदार राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, उपतालुकाप्रमुख सरदार सिंग ठाकूर, बाळकृष्ण घोडके, युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव, संतोष पुदाले, उपशहरप्रमुख शाम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे,ग्राहक कक्ष शहरप्रमुख नेताजी महाबोले, मकरंद भालकरे, समर्थ पाटील, विशाल गुड्ड,शिरगापूर शाखाप्रमुख लक्ष्मण जाधव,रोहन जाधव,अजित जाधव,प्रताप शिंदे,अजय सुरवसे, अंकित पवार,मनोज कस्तुरे,धोंडिबा माने, बिरु माने, भिमराव टकले, मुरलीधर शिनगारे उपस्थित होते.

तलमोड येथेही शिवसेनेने जाेरदार आंदोलन केले. वसुली पुन्हा सुरू केल्यास टोल नाका फोडून काढण्याचा इशारा देत टोल वसूली करण्यास भाग पाडण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, माजी तालुकाप्रमुख सुरेश वाले, विजयकुमार नागणे, माजी सरपंच बलभीम येवते, दगडु पाटील, महेश शिंदे, गोपाळ शिंदे, रणजित सास्तुरे, अनिल दंडगुले, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, शेखर कटकधोंड, विशाल व्हटकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती बैठक हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या सोलापूर -उमरगा या दरम्यानच्या अपूर्ण कामाच्या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, एसटीपीएलचे प्रकल्प संचालक तसेच जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दि. १४ नोव्हेंबरला बैठक घेतली होती. यामध्ये काम पूर्ण करण्याची तंबी देण्यात आली होती. अन्यथा १ जानेवारीला टोलनाके बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काम सुरूही केले नाही. यामुळे आंदोलन करण्यात आले.

८३ किलोमीटरचे काम रखडले राष्ट्रीय महामार्गावर अन्य ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, सोलापूरपासून उमरगा मार्गे कर्नाटक सीमेपर्यंत तब्बल ८३ किलोमीटरचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. यासंदर्भात पूर्वी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी अांदोलन केले होते. परंतु, काम करण्याचे केवळ आश्वासन मिळत गेले. प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले नाही. नंतर आंदोलनाची धारही बोथट होत गेली. यामुळे कंत्राटदार व प्रशासनाने महामार्गाच्या कामाकडे चक्क दुर्लक्ष केले आहे.

यामळे घडताहेत अपघात
अनेक ठिकाणी हायवेला जोडणाऱ्या अन्य रोडवरुन वाहने थेट महामार्गावर येत असल्याने अपघात होत आहेत. येेथे पर्यायी व्यवस्थेची गरज असताना दुर्लक्ष केले. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थेला पाचारण करण्याची मागणी असतानाही त्याकडेही दुर्लक्ष आहे.

१० वर्षांपासून रखडतच काम
सोलापूर ते कर्नाटक सीमा रस्त्याचे काम १० वर्षांपासून झाले नाही. तरीही फुलवाडी, तलमोड येथे टोल वसुली सुरू केली. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना याचे काही वाटत नाही. मात्र, सोलापूर, कर्नाटक सीमेलगतच्या प्रवाशांना फटका बसत असल्याने अनेक वर्षांपासून नाराजी आहे.

बातम्या आणखी आहेत...