आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मजूर दांपत्याला तुतीच्या शेतीतून 12 लाख उत्पन्न ; खामकरवाडीत प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील पोपटराव लुगडे यांनी तुतीच्या शेतीतून वर्षाला १० ते १२ लाख रुपये उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. एकेकाळी ५० ते ६० रुपयांवर मजूरी करणारा शेतमजूर म्हणून ओळख होती. आता एक प्रगतशिल शेतकरी म्हणून परिसरात ओळख निर्माण झाली आहे.

लुगडे यांनी २२००७ मध्ये त्यांच्या शेतात पहिल्यांदा तुतीची लागवड केली. याची प्रेरणा ते जेथे कामासाठी जात होते तेथून मिळाली. प्रथम त्यांनी एक एकरवर तुतीची लागवड केली. पहिल्या तीन वर्षापर्यंत एक एकर मधील उत्पन्नावर आर्थिक प्रगती केली. नंतर त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान आणि उत्पन्नातून नवीन दोन एकरावर पत्नीच्या नावे तुती लागवड केली. शासनाकडून अनुदान तर मिळालेच तसेच तुतीची झाडी कट करण्याची मशीन आणि अन्य साहित्यही मिळाले.

पुढे त्यांच्या मुलाचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यालाही या रेशीम उत्पादनाशी निगडीत तुतीच्या शेतीतच पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी आणखी एक एकरवर तुतीची नवीन लागवड केली. असे एकूण त्यांचे तुतीच्या लागवडीखालील क्षेत्र चार एकर झाले आणि तीन शेडही तयार केले. त्यातून त्यांना आज घडीला वार्षिक उत्पन्नही साधारणत: दहा ते बारा लाखापर्यंत मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे त्यांचा लौकीक प्रगतशिल शेतकरी म्हणून झाला आहे.

आता १४ एकरचे मालक
पोपटराव लुगडे यांनी दरवर्षी एक-दोन एकर जमीन घेतली. आजतागायत त्यांची अगोदरची स्वत:ची पाच एकर आणि नवीन खरेदी केलेली आठ-साडेआठ एकर जमीन आहे. अशी सर्व मिळून १४ एकर जमिनीचे आज ते मालक आहेत. त्यामुळेच आज त्यांची ओळख एक शेतमजूर न राहता लखपती म्हणून झाली आहे.

रेशीमला कोषास बाजारपेठ
रेशीम कोषाला बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. लुगडे यांनी केंद्रशासनाच्या योजनेतून रेशीम शेतीस सुरुवात केली होती. सुरुवातीस लाकडी शेड उभारले. नंतर उत्पन्नातून त्यांनी चांगल्या प्रकारचे शेड उभारणी केले. उत्पन्नातून सुरुवातीला त्यांना एकरी अडीच लाखापर्यंत निव्वळ नफा मिळू लागला.

तुतीला १५ दिवसांच्या अंतराने लागते एकदा पाणी
तुतीला हलक्या जमिनीस केवळ एखादे जास्तीचे पाणी द्यावे लागते. सर्वसाधारण जमीन असेल तर किमान १५ दिवसांतून एकदा पिकास द्यावे लागते. पिकांस उन्हाळ्यात पाणी नसले तरी चालू शकते. अन्य पिकांस पाणी हे द्यावेच लागते. त्यामुळे हे पीक घेणे फायदेशीर आहे. सलग चार महिन्यांपर्यंत हे पीक विना पाण्याचे जीवंत राहू शकते.

बातम्या आणखी आहेत...