आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी तालुक्यातील नोंदणीकृत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या १७ तर मराठी माध्यमाच्या एक अशा १८ विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली वर्गासाठी १६३ प्रवेशाच्या जागा राखीव होत्या मात्र, तीन शाळास एकही अर्ज नसल्याने लॉटरी पद्धतीने उर्वरित शाळांसाठी १५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र करण्यात आले होते. त्यापैकी मंगळवारी (१०) अखेरच्या दिवशी १२२ प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीईअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून वरिष्ठ पातळीवर लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करून स्थानिक पातळीवर पडताळणी करून प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवली जाते.
शाळानिहाय निश्चित झालेली प्रवेश संख्या शायनिंग स्टार इंग्लिश स्कूल दाळिंब पाच, संजीवनी मॉडर्न इंग्शिल स्कूल एकोंडी जहागीर दहा, डॉ. एचबीके इंग्लिश स्कूल उमरगा एक, फिनिक्स इंग्लिश स्कूल गुंजोटी चार, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मुरुम दहा, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल तुरोरी आठ, रायझिंग सन इंग्लिश स्कूल उमरगा दोन, श्री श्री रविशंकर मराठी प्राथमिक शाळा उमरगा दोन, डॉ के डी शेंडगे इंग्लिश स्कूल उमरगा १८, माऊली इंटरनॅशनल स्कूल उमरगा दोन, श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल तीन, ओरियन इंग्लिश स्कूल, उमरगा ११, डॉ. कुशाबा धोंडिबा शेंडगे सीबीएसई स्कूल उमरगा आठ, लोटस पोद्दार इंग्लिश स्कूल, उमरगा १३, हायटेक इंग्लिश स्कूल, येणेगूर-१९. तर छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल बलसूर येथे एक, समृध्दी इंग्शिल स्कूल चिंचोली भुयार येथे एक, इंदिरा इंग्लिश स्कूल कुन्हाळी येथे चार जागा असतानाही पालकांनी ऑनलाइन मागणी अर्जातच प्रवेशाची मागणी केलेली नाही. प्रस्तावाची पडताळणी गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी केल्यानंतर १२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.