आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना पॉझिटिव्ह:उमरगा तालुक्यात ऑगस्टच्या २८ दिवसांत १२३ पॉझिटिव्ह

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ऑगस्टच्या २८ दिवसात १२३ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जूनमध्ये ४० पॉझिटिव्ह आले होते. जुलैमध्ये २१२ कोरोना रुग्ण आढळले. कोरोनाच्या चौथ्या लाटेत जूनपासून आतापर्यंत ३७५ कोरोना पॉझिटिव्ह आले असून ३७२ कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात सध्या दोन रुग्ण उपचारात आहेत.

तालुक्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४२ टक्के तर मृत्यूदर ०.२९ टक्क्यांवर आल्याने उपचारात १.२९ टक्के रुग्ण आहेत. मागील दोन महिन्यात कोरोना संसर्गात वाढ होत असल्याने सण व उत्सव काळात शहर व तालुक्यात कोरोनाची भीती वाढली आहे. रविवारी (दि. २८) उपजिल्हा रुग्णालय मुरुम ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या ४५ स्वॅब अहवालातून दोन जण पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागामध्ये मुरूम, एकुरगा येथे प्रत्येकी एक असे एकूण दोन पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत चौथ्या लाटेत शहरात १५७ तर ग्रामीण भागात २१८ जण पॉझिटिव्ह आले.

बातम्या आणखी आहेत...