आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा झेंड्यासह पदयात्रा:कळंबमध्ये १२५० फुटांची तिरंगा पदयात्रा

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येथे स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने १२५० फूट लांब तिरंगा झेंड्यासह पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेची सुरुवात गणपतराव कथले चौकात झाली. सर्वप्रथम १२५० फूट तिरंगा झेंड्याचे पूजन अशोक मोहेकर, बंडोपंत दशरथ, महादेव महाराज आडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश, तहसीलदार मुस्तफा खोंदे, न. प. मुख्याधिकारी शैला डाके, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला.

कथले चौक, सोनार लाइन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ पदयात्रेची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. शोभायात्रेत शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, रेणुका फाउंडेशन, विद्याभवन हायस्कूल, सावित्रीबाई फुले विद्यालय, सुफीया उर्दू स्कूल, मॉडेल इंग्लिश स्कूल, नगरपरिषद शाळा क्रमांक १, २ आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...