आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय विज्ञान‎ दिन:विज्ञान दिनी प्रदर्शनात‎ 128 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

धाराशिव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नूतन प्राथमिक‎ विद्यामंदीरमध्ये राष्ट्रीय विज्ञान‎ दिनानिमित्त आयोजित करण्यात‎ आलेल्या विज्ञान प्रदर्शनात १२८‎ विद्यार्थ्यांची सहभाग नोंदवला.‎ प्रदर्शनाचे उद्घाटन आदर्श‎ शिक्षण प्रसारक मंडळाच्या‎ सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी‎ केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक‎ प्रदिपकुमार गोरे व महाराष्ट्र राज्य‎ गणित अध्यापक महामंडळाचे‎ सचिव कुमार निकम यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.

प्रशालेतील इयत्ता‎ तिसरी व चौथीतील १२८ विद्यार्थ्यांनी‎ प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला.‎ यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक‎ ऊर्जास्त्रोत, सूर्यमाला,‎ जलशुद्धीकरण, वाहतूक व्यवस्था,‎ पचनक्रिया, जलचक्र,‎ अन्नसाखळी, मानवी अवयव कार्य‎ पद्धती असे अनेक प्रयोग तयार केले‎ होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ शितल उटगे व सारिका उमरकर‎ यांनी विशेष प्रयत्न केले .‎ कार्यक्रमास संजय जाधव, रामराजे‎ पाटील, सुजित वाडकर, रविकुमार‎ मुळे, किशोर साबळे यांच्यासह इतर‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...