आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारली दांडी:निवडणूक प्रशिक्षणास 14 कर्मचाऱ्यांनी मारली दांडी

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १०) आयोजित मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला १४ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. प्रशिक्षणाला ९७७ कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राधिकृत अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी मार्गदर्शन केले.

तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. शनिवारी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सकाळी ११ ते २:३० पर्यंत चाललेल्या या प्रशिक्षणाला ९९१ पैकी १४ मतदान अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिले. या गैरहजर कर्मचाऱ्यांना यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार तांदळे यांनी इव्हीएम हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या शिवाय मतदान प्रक्रिया, नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, संवैधानिक बाबी आदींची प्रोजेक्टरच्या सहाय्याने सविस्तर माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार अमित भारती, दत्ता कुलकर्णी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...