आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारित वितरण क्षेत्र योजना:महावितरण सक्षमीकरणासाठी  १४ हजार २६६ कोटींचा खर्च होणार

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणाऱ्या काळात वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला सध्याच्या वीजवितरण प्रणालीचे आणखी सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्टकरण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजने पैकी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च हा वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर होणार आहे. या मुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी लातूर येथे बोलताना सांगितले. राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणाली मध्ये आमुलाग्र बदल घडून येणार आहे.सशर्त आर्थिक सहाय्याद्वारे आर्थिक स्थिरता व परिचालन कार्यक्षमतेत सुधारणा करणे, वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीज पुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता यात सुधारणाकरणे अशी या योजनेची वै‍शिष्ट्ये आहेत. महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार, विश्वासार्ह व वाजवी किंमतीचा वीजपुरवठा करण्यासाठी वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी १४ हजार २६६ कोटीरुपये खर्च होणारआहेत. त्यात राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्र उभारली जाणार आहेत. तर २९९ उपकेंद्रांत अतिरिक्त रोहित्र बसविले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...