आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वृद्धाचे 1.5 लाखाचे‎ दागिने लांबवले‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरून शेतात जाणाऱ्या कवठा (ता. औसा) येथील‎ एका वयोवृद्ध नागरिकांना पोलिस असल्याचे सांगत दोघांनी‎ लुबाडले. सुरक्षित ठेवण्याच्या निमित्ताने एक लाख ४० हजार‎ रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी उमरगा पोलिस‎ ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ कवठा येथील भिमराव गुडेराव नेलवाडे (६५) जुना‎ कवठा जय मल्हार धाब्याच्या बाजूच्या कच्च्या रोडने‎ दुचाकीवरुन शेताकडे जात होते.

दरम्यान, दोन अनोळखी‎ पुरुषाने नेलवाडे यांना पोलिस असल्याची बतावनी करुन‎ अडवले. "चाेरीची भीती असल्यामुळे तुमच्या जवळील‎ दागिने आम्हाला द्या.'' असे नेलवाडे यांना सांगत दागिने‎ मागितले. त्यावर नेलवाडे यांनी त्यांच्या जवळील ४० ग्रॅम‎ वजनाचे सुवर्ण दागिने काढून त्या तोतया पोलीसाकडे दिले.‎ दागिने पिशवित टाकतो असे भासवून त्या दोन भामट्यांनी‎ हातचलाखीने नेलवाडे यांचे दागिणे लांबवले. नेलवाडे यांनी‎ फिर्याद दिल्यावर उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...