आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारींचे निवारण:1563 जणांना घरगुती नवीन वीज जोडणीचा लाभ

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण यासाठी विशेष पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्ह्यात १५६३ जणांना नवीन वीज जोडण्यांचा लाभ देण्यात आला. राज्यात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ या पंधरवड्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने राज्यात विशेष कामगिरी करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते.

यात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अडचणींचा प्राधान्याने निपटारा करण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यात महावितरणने नवीन वीज जोडणी सोबतच ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन ग्राहकांना वीज जोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते.

तसेच वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रावर ही सेवा देण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नावाचा बदल करण्यासाठी महावितरणचे कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना या काळात सुविधा मिळाली. तसेच पैसे भरूनही नवीन मीटरच्या प्रतीक्षेत असलेल्या घरगुती ग्राहकांना नवीन वीज मीटर गतीने मिळत असल्यामुळे ते घरात बसविण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...