आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहन:परंडा शहरात  १७५ फूट तिरंगा महारॅली

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कमांडो करिअर ॲकाडमीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त १७५ फुट तिरंगा महारॅली काढण्यात आली.येथील कमांडो करिअर ॲकाडमीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पोलीस सुनिल गिड्डे, सपोनि मुसळे योगेश यादव,यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

त्यानंतर १७५ फुट लांबीच्या तिरंगा रॅलीचा शुभारंभ माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे युवा नेते रणजित पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, संस्थापक अध्यक्ष महावीर तनपुरे, सचिवा भाग्यश्री तनपुरे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते. तिरंगा महारॅलीस कमांडो करिअर ॲकाडमी पासुन सुरवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावर रॅलीचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...