आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उमरग्यात वाद-विवाद स्पर्धेमध्ये 18 शाळांचा सहभाग

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरणप्पा मलंग यांच्या जयंतीनिमित्त कै. शरणप्पा मलंग विद्यालयात गुरुवारी (दि.६) आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार शिवाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान स्पर्धेसाठी तालुक्यातील १८ शाळेतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. आयोजित स्पर्धेत भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग हे होते. यावेळी संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, संजय मलंग, शिवशंकर व्हंडरे, प्रवीण माशाळकर, मुख्याध्यापक अजित गोबारे, कवीराज रेड्डी, वैजिनाथ माशाळकर उपस्थित होते. प्रारंभी . शरणप्पा मलंग पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार कदम म्हणाले की, मलंग यांनी शासकीय कार्यालयाच्या उभारणीसाठी जमीन दान केली. यामुळे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण पद्धती स्पर्धा परीक्षेवर अवलंबून असल्याने आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर नोकरीच्या मागे धावण्याची गरज नाही तर नोकरी तुमच्या मागे लागेल. ज्याला यश मिळत नाही त्यांनी एखादा उद्योग काढण्याचा बी प्लॅन ठेवा असे आवाहन केले.

तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेत उमरगा-लोहारा तालुक्यात एकूण अठरा शाळेच्या संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेचा विषय आजच्या शैक्षणिक दुरवस्थेला राजकीय अस्थिरता जबाबदार आहे/नाही. यावेळी राजकीय अस्थिरता बाजूने मत व्यक्त करताना सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत शाळा शिक्षण, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असून शिक्षणाला वाटा न देता फाटा मारला जातो. गृहपाठ बंद, कमी पट संख्येच्या शाळा बंद, शिक्षक भरती बंद असे दिवसातून दहा जीआर काढूनच शासन स्वतःचीच शिक्षण व्यवस्था मोडीत काढत असल्याचा आरोप केला. राजकारणातील अस्थिरता नाही म्हणण्याची सरकारी शाळा नाकारणारे पालक मोबाइल वेडे झाल्याचे सांगितले. मुख्याध्यापक गोबारे यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक प्रा. अवंती सगर, प्रा. विनोद देवरकर, रेखा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी हिप्परगे यांनी आभार मानले. उमरग्यात वाद-विवाद स्पर्धेमध्ये १८ शाळांचा सहभाग

स्पर्धेत भारत विद्यालय प्रथम
वाद-विवाद स्पर्धेत प्रथम भारत विद्यालय, द्वितीय के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल, तृतीय डॉ. खुशाबा धोंडीबा शेंडगे सीबीएसई स्कूल, तर उत्तेजनार्थ स्वामी विवेकानंद विद्यालय, त्रिकोळी संघाने क्रमांक पटकाविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत विविध स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांना मार्ग मिळतो. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...