आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओएनजीसी तर्फे सीएसआर फंडातून जिल्ह्यातील आठ तहसीलमधील ९३ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दुधाळ जनावरे (मिश्र जातीच्या गायी) पुरवण्यासाठी सात प्रकल्प हाती घेतले. यात उस्मानाबाद तालुक्यात १३, उमरगा ११ ,कळंब १३, भूम ११, परंडा ११, तुळजापूर १२, आणि लोहारा ११ लाभार्थींना लाभ मिळणार आहे. एकूण १८६ गायी ९३ कुटुंबांना देण्यात येथील त्यावर एक कोटी २३ लाख ८८ हजार ९०२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प उस्मानाबाद येथील जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन, विभागाच्या मार्फत आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. उस्मानाबाद हे नीती आयोगाने निवडलेल्या आकांक्षी जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून विकासकामे करण्याची जबाबदारी ओएनजीसीकडे देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.