आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:जुन्या भांडणावरून भाटशिरपुरा येथे 19 वर्षीय युवकाचा खून; दोन आरोपींपैकी एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

शिराढोण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोटात चाकू भोसकून खून

कळंब तालुक्यातील भाटशिरपूरा येथे जुन्या भांडणावरून एका १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. ९) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

भाटशिरपूरा येथील इक्बाल युसूफ सय्यद व उत्रेश्वर बापुराव झोंबाडे यांच्यात जुन्या भांडणाच्या कुरापतीवरुन वाद निर्माण झाला होता. या भांडणात इक्बाल व उत्रेश्वर यांच्यात मोठा वाद सुरू होता. भांडणातच इक्बाल सय्यद याला उत्रेश्वर झोंबांडे यांनी धरुन ‘याला मारुन टाक’, असे म्हटल्यावर कैलास लोंढे याने इक्बालच्या पोटात चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी केले. यात इक्बाल सय्यद याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती शिराढोण पोलिसांना मिळताच तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश, सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके, पोलिस उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी घटनास्थळी जावून पोलिस पंचनामा केला. यातील दोन आरोपींपैकी कैलास लोंढे यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अमीर पैगंबर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उत्रेश्वर उर्फ बाबा बापुराव झोंबाडे व कैलास महादेव लोंढे यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...