आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चढाओढ‎:काक्रंब्यात पदभारासाठी‎ 2 ग्रामसेवकांत चढाओढ‎

काक्रंबा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायतीत पदभार‎ घेण्यासाठी दोन ग्रामसेवकांमध्ये‎ चढाओढ लागली आहे. एक‎ ग्रामसेवक पदभार घेण्यासाठी ठाण‎ मांडून बसला आहे तर दुसरा पदभार‎ सोडायला तयार नाही. त्यामुळे‎ गावातील विकासाला खीळ बसली‎ आहे.‎ काक्रंबा (८ ते १० हजार‎ लोकसंख्या) गावची पंचवार्षिक‎ निवडणूक दोन महिन्यांपूर्वीच‎ झाली.

मतदारांनी कुणालाही स्पष्ट‎ बहुमत दिले नाही. परंतु‎ निवडणुकीत तरुण निवडून आले‎ आहेत. काक्रंबा ही मोठी व‎ तुळजापूरपासून हाकेच्या‎ अंतरावरील ग्रामपंचायत असल्याने‎ शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी‎ मिळतो. त्यामुळे पदभार घेण्यासाठी‎ दोन ग्रामसेवकात स्पर्धा लागली‎ आहे. पूर्वीचे ग्रामसेवक जिलानी‎ तांबोळी हे वैद्यकीय रजेवर गेले‎ आहेत. त्यामुळे नूतन सरपंच व काही‎ सदस्यांनी पंचायत समितीकडे नवीन‎ ग्रामसेवक देण्याची मागणी केली.‎ परंतु तांबोळी यांची रजा‎ संपण्यापूर्वीच बीडिओंनी ग्रामसेवक‎ म्हणून केवळराम यांची नियुक्ती‎ केली. केवळराम जॉइन होऊन एक‎ महिना होत आला. त्यांनी मासिक‎ सभा, ग्रामसभा घेऊन कामकाजही‎ सुरू केले. परंतु पूर्वीचे तांबोळी‎ ग्रामसेवक येथेच काम करण्यास‎ उत्सुक आहेत.

त्यामुळे त्यांनी पदभार‎ सोडला नाही. नव्याने रुजू झालेले‎ ग्रामसेवक केवळराम हे‎ काक्रंब्यासाठीच उत्सुक असल्याने‎ ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे‎ मागील एका महिन्यापासून दोन‎ ग्रामसेवकांमध्ये काक्रंबा‎ ग्रामपंचायतीचा पदभार घेण्यासाठी‎ चढाओढ लागली आहे. यामुळे‎ नागरिकांच्या कामांसह गावातील‎ विकासकामे खोळंबली आहेत.‎ सरपंच कालिदास खताळ हे सुद्धा‎ पंचायत समितीचे उंबरठे झिजवून‎ वैतागले आहेत. याप्रकरणी जिल्हा‎ परिषदेच्या मुख्य कार्यकारी‎ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची‎ मागणी होत आहे.‎

पाच वर्षात ८ ग्रामसेवक,‎ यावेळी किती?‎
काक्रंबा येथील अंतर्गत राजकारण,‎ विरोधकांचा सातत्याने विरोध‎ आदींमुळे येथील ग्रामपंचायतीचा‎ पदभार घेऊन काम करण्यास‎ कोणताही ग्रामसेवक तयार नव्हता.‎ वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे गत‎ पाच वर्षात काक्रंब्याला तब्बल ८‎ ग्रामसेवक लाभले. त्यामुळे यंदा‎ सुरुवातीपासूनच कोणता ग्रामसेवक‎ घ्यायचा, यावरुन रस्सीखेच सुरू‎ झाली आहे. त्यामुळे या‎ पंचवार्षिकमध्ये किती ग्रामसेवक‎ लाभणार, हे पाहणे औत्सुक्याचे‎ ठरणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...