आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल:दुचाकींच्या 2 अपघातात दोघांचा मृत्यू, गुन्हा नोंद

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील किलज - चिकुंद्रा व उस्मानाबाद तालुक्यातील आंबेहोळ शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. किलजचे शिवराज महादेव शेळके यांसोबत रविचंद्र शिवाजी गायकवाड किलज ते चिकुंद्रा रस्त्याने दुचाकीवर जात होते. शेळके यांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवून गडास धडकवली. यात रविचंद्र यांचा मृत्यू झाला. गोवर्धन बाबुराव आवड दुचाकीवरून जाताना अंबेहोळ शिवारात फिरोज शब्बीर पठाण याने दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गोवर्धन यांचा मृत्यू झाला. नळदुर्ग, उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...