आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण संख्या:जिल्ह्यात उपचाराखाली 20 रुग्ण ; लस घेण्याचे लोकांना गांभीर्य नाही

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी अद्यापही काही प्रमाणात रुग्ण आढळतच आहेत. सध्या उपचाराखाली केवळ २० रुग्ण असले तरी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळत होते. २०० पेक्षाही अधिक रुग्ण उपचार घेत होते. काही वेळी तर दररोज ५० रुग्ण आढळत हाेते. नंतर हीच संख्या हळूहळू कमी झाली. सध्या अगदी एकेरी आकड्यात कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. बुधवारीही एक रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात हा रुग्ण आढळला आहे. सातत्याने काही प्रमाणात का होईना रुग्ण आढळत असल्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज आहे. सध्या बाधित रुग्णांची संख्या ७५ हजार ८५१ वर गेली आहे. यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७३ हजार ७१२ आहे. तसेच २११९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जिल्हा अंतर्गत रुग्णालयामध्ये १५३९, जिल्ह्याबाहेर मृत्यू झालेले ३६५, आजाराने मृत्यू झालेले १०७ तर कोविड बरा झाल्यानंतर मृत्यू झालेले १०८ रुग्ण आहेत.

कोरोनाची भिती संपली तरी टांगती तलवार अद्याप कायम आहे. कारण सणावारामुळे लोकांनी बाजारात हिंडताना जी काळजी घेणे गरजेचे आहे ती घेतली जात नाही. मास्क वापरणे तसे हात स्वच्छ करणे हे जवळपास कोणीही करत नाही. लस घेण्याचे गांभीर्य कोणास नाही. लोक अद्यापही गर्दीत बसमधून तसेच रेल्वेत प्रवास करतात. महामार्ग येथूनच जात असल्याने वाहनांची वर्दळ मोठी आहे. या परस्थितीत लोकांनी काही शिस्त बाळगणे महत्वाचे आहे. कोरोना संपला असे न समजता आवश्यक ती काळजी आजही घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...