आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिसेंबर महिन्यात शुभ खरेदीचे २१ शुभ योग जुळून आले आहेत. या काळात जमीन, घर, दुकान यासारखी स्थावर मालमत्ता खरेदी करणे लाभदायक असल्याचे दिसून आले. या पहिला योग रविवारी (दि. ४) असल्याचे समाेर आले आहे. या महिन्यात योगावर आधारित १३ तर नक्षत्रावर आधारित आठ मुहूर्त आहेत. ज्याेतिषांच्या मते स्थावर मालमत्ता आनंददायी असते. विशेष ग्रह- योगात त्यांची खरेदी शुभ मानली जाते.
मंगळ हा भूमिपुत्र मानला जातो. असे राष्ट्रीय ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष डाॅ. चंद्रशेखर शास्त्री सांगतात. पुण्य नक्षत्र खरेदीसाठी शुभ. त्यामुळे मंगळाचा पुण्याशी संयोग स्थावर मालमत्ता म्हणजेच जमीन, घर, दुकान खरेदीसाठी उत्तम आहे. ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार विशेष योगात मालमत्ता खरेदी सुख – समृद्धी कारक असते. या नक्षत्रांमध्ये केलेली खरेदी शुभ ठरते. ज्योतिष आचार्य पं. रामचंद्र शर्मा वैदिक यांच्या मते आश्लेषा, मघा, अनुराधा, विशाखा, पूर्वा, भाद्रपद, पूर्वी फाल्गुनी, पुष्य आणि रेवती नक्षत्रांमध्ये मालमत्ता खरेदी ही शुभच असते.
या काळात खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेमध्ये वाढच होत जाते. त्याच बरोबर ही मालमत्ता वापरणाऱ्यांची प्रगती होत जाते. पितांबरा, ज्योतिष पीठाच्या ज्योतिषी अर्चना सरमंडल यांच्या मते मुहूर्त आणि ग्रह नक्षत्रांच्या आधारे खरेदी केलेली संपत्ती जीवनातील इतर संकटापासून वाचवते.
वापराच्या आधारावर खरेदी - शास्त्रानुसार गुरुवार-शुक्रवारी खरेदी केलेली मालमत्ता लाभदायक असते. लग्नाचे तीन प्रकार आहेत. चर, स्थिर व द्विस्वभाव आपल्याला तिथे राहायचे असेल तर स्थिर लग्न म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ लगन असताना खरेदी करावी. कारखाना किंवा व्यवसायासाठी चर म्हणजे मेष, कर्क, तूळ व मकर लग्नामध्ये खरेदी करावी.
योग, नक्षत्रांचा चांगला प्रभाव होतो
मालमत्तांसह मनुष्याच्या आयुष्यावर योग आणि नक्षत्रांचा चांगला प्रभाव पडत असतो. तसेच अनेकदा अनवधानाने खरेदी केलेल्या मौल्यवान वस्तू, मालमत्ता या काहींच्या राशी उतरतात. तेंव्हाही कुठले तरी, योग जुळून आलेले असतात. या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात योग असून नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात जास्त योग आहेत. तसेच शुभ कार्यासाठीही मोठ्या प्रमाणात तिथी उपलब्ध आहेत.
नक्षत्रावर आधारित मुहूर्त
१ – पुर्वा भाद्रपदा, २ – रेवती, ८ आणि ९ – मृगशीर्ष, १५ – पूर्वा फाल्गुनी, १६ – उत्तरा आणि पूर्वा फाल्गुनी, २२ – मूळ, २३ – मूळ आणि पूर्वा फाल्गुनी, २९ – पूर्वा फाल्गुनी, ३० रेवती.
योगावर आधारित मुहूर्त
४, ६, ७, १३, २५, २६ – सर्वार्थ सिद्धी, ११ – रवि पुष्य, १२ – सोम पुष्य, २१ व ३० अमृतसिद्धी, २०, २४, २५ – त्रिपुष्कर (मुहूर्त ज्योतिष्यांनुसार)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.