आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिम:अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान 23 छापे ; सुमारे 180 लिटर ताडी जप्त

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलाकडून गुरुवारी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान २३ कारवाया करण्यात आल्या. छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे ३१२० लिटर अंबवलेला द्रव पदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे ७२८ लिटर गावठी दारु,१८० लिटर ताडी जप्त करण्यात आली. देशी- विदेशी दारुच्या एकुण २४१ बाटल्याही हस्तगत केल्या. उमरगा पोलिसांनी डिग्गी येथील संजय पवार व खलील जमादार, माडज येथील काशीनाथ सुगावे यांना पकडले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात वाशी तालुक्यातील गोजवाडा येथून मनिषा शिंदे, भुमच्या पारधी पिढीतील ताराबाई काळे, तुळजापूर येथील भारतसिंग राजपूत यांना पकडण्यात आले. तुळजापूर पोलिसांनी ४ ठिकाणी छापे टाकले. यात हंगरगा फाटा येथील परमेश्वर गायकवाड, हंगरगा फाटा येथे रामा क्षिरसागर, कुंभारी येथील शशिकांत तांबे, अपसिंगा येथील कर्ण डोलारे यांना पकडण्यात आले. अशाच प्रकारे मुरुम, लोहारा, ढोकी, भुम, बेंबळी, नळदुर्ग, अंबी, शिराढोन, येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...