आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण:राजेगाव परिसरात 2.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

लोहारा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजेगाव परिसरात शनिवारी (दि. १९) पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. २.४ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची नोंद भूकंपमापक केंद्रात झाली आहे.तालुक्यातील सास्तूर परिसरात १९९३ ला भूकंप झाला होता. यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. परिसरात झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २९ वर्षे झाली. शनिवारी (दि.१९) पहाटे २ वाजून ८ मिनिटाच्या सुमारास हा भूकंपाचा सौम्य धक्का झाल्याचे राजेगाव येथील नागरिकांनी सांगितले.

या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपमापक केंद्रात २.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. राजेगावसह सास्तूर, उदतपूर, मुर्षदपूर, एकोंडी (लो), होळी आदी गावात या भूकंपाचा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत लातूर येथील भूकंपमापक केंद्रातील अधिकारी परदेशी यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता भूकंपमापन केंद्रात नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या धक्क्यामुळे १९९३ मधील भूकंपाच्या कटू आठवणींनी थरकार उडवला.

बातम्या आणखी आहेत...