आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा सोमवारपर्यंत वितरीत होणार:पीकविम्याच्या 241 कोटींचे सोमवारपर्यंत होणार वितरण; आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

उस्मानाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलो-मोझॅक प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनातही मोठी घट आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या व ज्यांची पंचनाम्यासह प्रक्रिया पूर्ण झाली, त्यांना पहिल्या टप्प्यातील २४१ कोटींचा विमा सोमवारपर्यंत वितरीत होणार आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.

खरीप २०२० व २०२१ च्या पीक विम्याचा लढा सुरू आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी २०२२ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यासाठी मी आवाहन केले होते. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. या हंगामात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले. पहिल्या टप्प्यातील प्राप्त तक्रारी नुसार पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने २४१ कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात येत आहे.

काही तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र व तीव्रता जास्त असल्याने २५ टक्के अग्रिम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी देखील१०४ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा केला असून त्यांना पूर्ण रक्कम देण्यात येत आहे. पडताळणी करून आवश्यकतेप्रमाणे शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम ही मिळेल. आता पहिला टप्पा वितरीत होत असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत शेतकऱ्यांना विमा मिळेल. शिंदे-फडणवीस सरकार मुळे बळीराजाला पहिल्यांदाच विमा रक्कम एवढ्या लवकर मिळत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

२२० कोटींना मंजुरी शक्य
जिल्ह्याला नुकसानीपोटी ३०४ कोटी मंजूर झाले आहे. यातील २४५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. ५९ कोटी रुपये मंजूर आहे. ही रक्कम ही प्राप्त होणार आहे. या व्यतिरिक्त सततच्या पावसापोटी जिल्हा प्रशासनाकडून २२० कोटी रुपयांची मागणी प्रलंबित असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या रक्कम देखील मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...