आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणाला गती‎:कडदोरात 25 शेततळी; हरितक्रांतीची सुरूवात‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागाच्या विकासाचा मुख्य‎ धागा म्हणजे पाणी. अवर्षणामुळे‎ मराठवाडा कायम विकासापासून दूर‎ राहीला आहे. मराठवाड्याचा‎ विकास पाण्यावाचून आणि प्रबळ‎ इच्छाशक्तीच्या अभावामुळे वंचित‎ राहिला आहे. शेतीसाठी मुबलक‎ बारा महिने पाणी उपलब्ध झाल्या‎ शिवाय विकासाची गंगा वाहणार‎ नाही.त्यामुळे तालुक्यातील कडदोरा‎ गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे‎ महत्व अोळखून शिवारात २५‎ शेततळी बांधली आहेत.

त्यामुळे‎ शेतकऱ्यांच्या जिवनात नव्या‎ हरितक्रांतीची सुरूवात झाली.‎ कडदोरा गावात गेल्या पाच‎ वर्षापासून जलसंधारणाची चळवळ‎ गावात उभी राहिली आहे. प्रारंभी‎ डॉ.दीपक पोफळे आणि प्रवीण‎ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी‎ क्लबच्या माध्यमातून जलसंधारण‎ कामाला सुरूवात केली आणि‎ शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला.‎

त्यानंतर रिलीफ फंडातून ओढ्याचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खोलीकरण व सरळीकरण‎ करण्यात आले. जलसंधारणाची ही‎ चळवळ गतिमान करण्यासाठी‎ तत्कालीन तालुका कृषी अधिकारी‎ सुनील जाधव, तत्कालीन‎ गटविकासाधिकारी भरत जगताप‎ यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी‎ गावात २५ शेततळी निर्माण करण्यात‎ आली. यावर्षी वॉटर शेड‎ ऑर्गनायझेशन ट्रस्टमार्फत गावात‎ अभियंता मंगेश मांडगे, समीर‎ सय्यद, सचिन हत्तरगे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली जलसंधारणाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कामाला गती मिळाली आहे.

वॉटर‎ शेड ट्रस्ट संस्थेच्या पाणलोट‎ विकासाचे सोबत सिसीटी, सिमेंट‎ बंधारे, एलबीएस विविध प्रकार‎ भूगर्भातील पाणीसाठा‎ वाढवण्यासाठी आणि दीर्घकाळ‎ टिकवण्यासाठी पर्यायाने‎ शेतकऱ्यांच्या पिकांना बारा महिने‎ पाणी उपलब्ध होईल एवढा भूगर्भात‎ साठा व्हावा, आणि पाण्याचा वापर‎ नियोजनबद्ध व्हावा, या उद्देशाने‎ कामाची सुरूवात करण्यात आली‎ असून त्याचा लाभ होत आहे.‎

दोन्ही हंगामात पीक‎
शेताच्या शेजारी असलेल्या‎ ओढ्याचे खोलीकरण आणि‎ सरळीकरण झाल्याने पहिल्या‎ पावसातच विहिरीला पाणी आले.‎ ओढ्यात पाणी थांबून राहिल्यामुळे‎ विहिरीचे पाणी जास्त काळ टिकून‎ राहते. यामुळे खरीप आणि रब्बी‎ पिके यशस्वीपणे घेण्यात येत आहेत.‎ परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात‎ वाढ झाली. शिवराम पाटील,‎ शेतकरी, कडदोरा.‎

बातम्या आणखी आहेत...