आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजावयाचा मान अन् सन्मान करण्याची परंपरा असली तरी धुळवडीला गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा उस्मानाबादेतील कळंब तालुक्यातील इटकूर येते आहे. यामुळे इटकूर येथील जवळपास २५ तर परिसरातील ५० जावई फरार झाले आहेत. काही जावयांनी धुळवडीच्या अनुषंगाने बालाजी, शिर्डी, गोवा यासह इतर पर्यटनस्थळी सहली काढल्या आहेत. जावयाची गावभर मिरवणूक काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी भरपेहराव आहेर केला जातो.
होळीचा सण हा वाईटांचा नाश करणारा, म्हणून तो सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसाला, धुलीवंदनाला, धुळवड असेही म्हटले जाते. या सणाने वसंत ऋतूचे स्वागत केले जाते. निसर्गाच्या नव्या बहराचे स्वागत करण्यासाठी आणि सुगीचा आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच त्यानिमित्ताने सर्व दुर्गुण नाहीसे व्हावेत, अहंकार नष्ट व्हावा म्हणून होळी दहनाचा कार्यक्रम केला जातो. दुर्गुणाच्या नावाने बोंबाही ठोकल्या जातात. ही धुळवडीची प्रथा आता गावची संस्कृती बनली आहे.
जावई धुळवडला आला की पडकून गाढवावर बसवतात आणि धुळवड साजरी करण्यात येते. अशाप्रकारे इटकूर गावातील ही अनोखी परंपरा दरवर्षी जपली जाते. विशेष म्हणजे १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून जपली जात असल्याचे वयोवृद्ध सांगतात. धुलिवंदनाच्या दोन दिवस आधी जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे, याची माहिती काढली जाते, धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.
एखाद्या जावयाला गाढवावर बसवले जाते आणि धुळवड साजरी केली जाते, हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी नागरिक या गावात येतात. कोरोनामुळे २०२० व २०२१ मध्ये या परंपरेत खंड पडला होता. यंदा पुन्हा ही परंपरा सुरू करण्यात येत आहे. यामुळे बहुतांश जावई भूमिगत झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.