आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मनसेचा 25 नोव्हें. रोजी रास्ता रोकोचा इशारा

उस्मानाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्रं.६५ जुना ९ च्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्गावर मौजे दाळिंब ता.उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातचे निवेदन नुकतेच देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्रं.६५ च्या चौपदरी करण्यासाठी धाराशिव जिल्यातील उमरगा,लोहारा व तुळजापूर तालुक्यातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत.परंतु अद्याप शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळालेला नाही. तसेच मौजे दाळिंब तलाठी सजा अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणासाठी ३० मिटर संपादित करण्यात आले व या पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग ३० मिटर रुंदीचा होता. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभाराने दाळिंब सज्जा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्य सात बारा वरील १५ मिटर अतिरिक्त १५ मिटर जमीन कमी करण्यात आली आहे. मात्र याचे रेकॉर्ड नाही. या मागण्यांसाठी दिनांक २५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व सर्व अन्यायग्रस्थ शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर मनसेचे शाहूराज माने, बाबुराव टिकांबरे, पांडूरंग सारणे, खंडू सुरवसे, भीमा गायकवाड, सुधाकर सुरवसे, शंकर चव्हाण, गोजर बनसोडे आदींची स्वाक्षरी आहे

आश्वासनाची पूर्तता नाही
१ जुलै रोजी रोडवर पडलेले खड्डे बुजवावे व सर्व उड्डाण पुलाचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी अधिकारी अनिल शर्मा यांनी लेखी पत्र देऊन सहा महिन्याच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले होते. परंतु अद्याप कामाला सुरवात सुद्धा झाली नाही. त्यामुळे आंदोलन कर्त्याची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. दोन्ही फुलवाडी आणि तलमोड येथील टोल नाके सुरु झाल्यापासून आज पर्यंत टोल वसुली किती झाली आहे व त्याचा विनियोग कशा प्रकारे करण्यात आला याची माहिती देण्याची या निवदेनाव्दारे करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...