आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रणासाठी पाळावे लागतील कोरोना काळातील निकष:जिल्हा रुग्णालयासह खासगी बाल रुग्णालयांत एचएफएमडीचे २५ % रुग्ण

बाळासाहेब माने | उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून मुलांमध्ये सर्वाधिक एचएफएमडी अर्थात हँड फूट माउथ डीसीज हा व्हायरल आजार आढळून येत आहे. यामध्ये मुलांना ताप, हात व पायावर पुरळ येणे, उलटी, मळमळ, तोंड येणे तर काही मुलांमध्ये जुलाब आदी लक्षणे आढळून येत येतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने नाक, डोळे, तोंडाला स्पर्श झाल्याने होतो. हे टाळण्यासाठी कोरोनाचे सर्व निकष पाळण्याची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. तसेच नागरिकांमध्ये सर्वाधिक व्हायरल फीव्हरचे रुग्ण आहेत.

जिल्हा रुग्णालयासह खासगी बालरोग बाह्य रुग्ण विभागात सरासरी २५ टक्के रुग्ण हे एचएफएमडीचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एचएफएमडी हा इतर व्हायरल आजारांप्रमाणेच हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो गंभीर नसला तरी त्याचा प्रसार झपाट्याने १५ वर्षाखालील मुलांमध्ये होत आहे. या आजारात प्रामुख्याने ताप येणे, तळहातावर, पायावर पुरळ उठणे, ती खाजवणे ही लक्षणे आढळतात. एचएफएमडी हा संसर्गजन्य आजार आहे. एखाद्या मुलास या आजाराची लागण झाल्यास त्याचा दुसऱ्या मुलांशी संपर्क झाल्यास होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की एचएफएमडी हा कॉमन आणि सौम्य आजार आहे. अशी लक्षणे आढळली तरी वैद्यकीय उपचार आणि आराम केल्यास पाच ते आठ दिवसांत रुग्ण बरा होतो. यामध्ये क्वचितच एखाद्या रुग्णाला उपचारासाठी दाखल करावे लागते. शक्यतो डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा आल्यास रुग्णास दाखल केले जाते. गेल्या वर्षी या एचएफएमडीच्या रुग्णांचे प्रमाण फार कमी होते. मात्र, यंदा ते सरासरी २५ टक्के असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगतात. तसेच नागरिकांमध्ये अंगदुखी, डोकेदुखीसह व्हायरल फिव्हरचे रुग्ण अधिक आहेत. नागरिकांनी मुलांसह स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे.

नियम पाळण्याची गरज
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हात न धुता जेवण घेतल्यास पोटातून तसेच हवेतून या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे शाळेत जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, घरी आल्यावर हात स्वच्छ धुणे हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. या आजाराचा विषाणू हातावर असल्यास हाताचा नाक, डोळे, तोंडाला स्पर्श झाल्यास हा आजार पसरू शकतो. सध्या वातावरण दूषीत असून कोरोनाचे नियम सर्वांनी पाळण्याची गरज आहे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...