आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह तालुक्यात ६२ दिवसांत २६५ जण पॉझिटिव्ह आले असून कोरोना संसर्गाची चौथ्या लाटे मध्ये जूनमध्ये ४०, जुलै २१२ असे २५२, ऑगस्टच्या दोन दिवसात १३ पॉझिटिव्ह आल्यामुळे २६५ पॉझिटिव्ह आले तर एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२३ कोरोनामुक्त झाले असून ४१ रुग्ण उपचारात आहेत. जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.
जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेत ३०दिवसामध्ये ४० पॉझिटिव्ह आले आहेत. जुलै महिन्यात २१२ पॉझिटीव्ह व एकाचा मृत्यू झाला असून ऑगस्टच्या दोन दिवसामध्ये १३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जुलै महिन्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगून राहणे गरजेचे आहे. जून महिन्यात चौथ्या लाटेला सुरूवात झाले असून जुलैै महिन्यात लाट धोकादायक झालेली आहे. जुलैै महिन्यात सातच्या सरासरीने २१२ पॉझिटिव्ह आलेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवात चार पॉझिटिव्हने झाली असून मंगळवारी (०२) सकाळी आरटीपीसीआर चाचणीत दोन, १०४ स्वॅब अहवाल ११ असे एकूण १३ पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये शहरात एसटी कॉलनी, चिंचोळे प्लॉट, जुनीपेठ येथे प्रत्येकी एक तर ग्रामीण भागात येळी,मुरूम,भुसणी, तुरोरी, हंद्राळ, तलमोड, नाईचाकुर, कोरेगाव, सास्तूर, आळंद येथे प्रत्येकी एक असे एकूण १३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गाच्या चौथ्या लाटेत ६२ दिवसात २६५ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात ११६ तर ग्रामीण भागात १४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४१ रुग्ण मुरूम ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचारात असून एकाचा मृत्यू झाला आहे.अनेक नागरिकांनी सोशल डिस्टन्स धुडकावून लावले आहे. मास्क वापरणे तर आता जवळपास बंद झालेले आहे. मात्र वरील स्थिती पाहता पुन्हा काळजी घेण्याची गरज वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.