आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14  जुलैपर्यंत 27.5  मिमी कमी पाऊस; असमतोल पावसामुळे शेतकरी संकटात

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जूनमध्ये पावसाने तुरळक भागात सुरूवात केली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत १४ जूनपर्यंत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून बी-बियाण्यांच्या दुकानातील गर्दी कमी होत असल्याचे दिसत आहे. २०२१ मध्ये १४ जूनपर्यंत ६८.२ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्या तुलनेत यंदा ४०.७ मिमी म्हणजेच गतवर्षाच्या तुलनेत यंदा २७.५ मिमी पाऊस कमी झाला आहे. असमतोल पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असून तुरळक पावसावर पेरलेल्या बियाणांची उगवण क्षमता कमी होत आहे.

यंदा महाराष्ट्रात चार दिवस अगोदर मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, १४ जूनपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याच भागात दमदार पाऊस झाला नाही. काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काहीप्रमाणात थंडावा जाणवत आहे. मात्र, यंदा उन्हाळ्यात एकदाही अवकाळी पाऊस झाली नाही. यामुळे उष्णतेचे प्रमाण अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...