आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड संसर्ग:कोरोनाचे आढळले 3 रुग्ण, पाच बरे होऊन गेले घरी

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोविड १९ आजाराचा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. मंगळवारी दिवसभरात केवळ तीनच रुग्ण सापडले असून, पाच रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या ३७ रुग्ण उपचार घेत आहेत. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट हळूहळू वाढायला लागली. त्यामुळे जुलै महिन्यात रुग्णांचा आकडा ५५ पेक्षा वाढला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा ३०० पार गेला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र असून, रुग्ण संख्या दररोज घटत आहेत. आज केवळ तीनच रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने दिलासा मिळत आहे. आजच्या रुग्णांमध्ये दोन रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील असून एक रुग्ण भूम तालुक्यातील आहे. उर्वरित तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. यात दोन पुरुष असून एक महिला आहे. तसेच दोन रुग्ण उस्मानाबाद शहरातील जुना उपळा रोड आणि वाणी गल्लीतील असल्याचे दिसून आले.कोरोनाची लाट ओसरली असली तरी भिती अद्याप संपलेली नाही हेच यावरून दिसून येते. तरीही लोक सरकारच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...