आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:3 लाख 1643 रेशनकार्ड धारकांना मिळणार शंभर रुपयांचे धान्य किट; पुढील आठवड्यात वाटप

हरेंद्र केंदाळे । उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात तीन लाख १६४३ रेशनकार्डधारक आहेत. यापैकी सर्वांनाच दिवाळीच्या तोंडावर शंभर रुपयांत साखर, तेल, रवा आणि चणाडाळ मिळणार आहे. याबाबत गुरुवारी पुरवठा विभागाच्या सचिवांनी व्हिसी (व्हिडिओ कॉन्फरन्स) घेऊन स्पष्ट आदेश दिले आहेत. त्या बाबतची मागणी नोंदवली असून पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना त्यानुसार पुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील (एपीलए) केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना म्हणजे या सर्वांना दिवाळीनिमित्त विशेष भेट मिळणार आहे. त्यासाठी रेशन दुकानातून शासनाकडून केवळ शंभर रुपयांत चार वस्तू मिळणार आहे. त्यात रवा एक किलो, साखर आणि चणाडाळ एक किलो असून एक लिटर पामतेलाचा समावेश आहे.

यासाठी आवश्यक लाभार्थींची माहिती शासनाने मागवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोंदणी करुन पुरवठा दारांकडून त्या वस्तू ई पॉश मशीनवर नोंदणी असलेल्या कार्डांच्या संख्येनुसार मिळणार आहे. त्याची मागणी तत्काळ कळवण्याचे आदेश दिले असल्याने पुरवठा विभागाने आपली मागणी पुरवठा दारांना कळवली आहे. त्यानुसार लाभार्थींना आगामी आठवड्यातच या वस्तूंचा पुरवठा होण्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

जिल्ह्यातील सर्व लाभार्थींना मिळेल किट
जिल्ह्यात अंत्योदय, कुटूंब प्राधान्य आणि शेतकरी म्हणजे दोन्ही केशरी कार्ड धारक लाभार्थींना हा मिळणार आहे. जिल्ह्यात यांची संख्या तीन लाख १६४३ आहेत. त्यांची नोंदणी ई पॉस मशीनवर असून त्यानुसार या सर्वांचे साहित्य रेशन दुकानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

3 लाख लाभार्थींना लाभ
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ४ ऑक्टोबर रोजी चार जिन्नस शंभर रुपयांत देण्याचा आदेश काढला आहे. त्यात नमुद केल्याप्रमाणे अंत्योदय, प्राधन्य कुटूंब आणि केशरी कार्ड धारक (एपीएल) शेतकऱ्यांना या वस्तू देण्याचे स्पष्ट केले आहेत. त्यानुसार एकूण तीन लाख १६४३ जणांना याचा लाभ मिळणार आहे.

२५० रुपयांचे किट शंभर रुपयांत
रेशन दुकानांमध्ये स्वस्तात लाभार्थींना साहित्य उपलब्ध करुन देण्यात येतात. आता शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणानुसार रवा, साखर आणि चणाडाळ यासह तेल यांची किंमत २५० रुपये होते. त्यानंतर या सर्व वस्तू रेशन दुकानातून केवळ शंभर रुपयात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळे यंदा गरिबाची दिवाळीही चांगली जाईल अशी आशा आहे.

साहित्य मिळाल्यानंतर वितरणाची जबाबदारी तहसीलदारांवर
मागणी नोंदवून साहित्य मिळाल्यावर त्याची वितरण करण्याची जबाबदारी संबंधीत तहसीलदारावर सोपवण्यात आली आहे. त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानात पुरवठा दारांकडून येणाऱ्या साहित्याचे एफएसएसएआय या मानांकनाचीच पूर्तता करणारेच असावे. तसेच या सर्व जिन्नसाचा दर्जा तपासणीसाठी त्याचे प्रयोगशाळेत नमुनेही पाठवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...