आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:प्रज्ञाशोध परीक्षेत कसबे तडवळेचे 3 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

कसबे तडवळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांचा शनिवारी (दि.११) शालेय समितीकडून सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद कन्या शाळेतील इयत्ता पहिलीतीलस्वरा काकासाहेब गावखरे, पद्मश्री दादा आडसुळ यांनी १५० पैकी १४४ गुण मिळवून मंथन राज्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला. तसेच केंद्रीय मुलांच्या शाळेतील आरूष सिद्धेश्वर सुरवसे या पहिलीतील विद्यार्थ्याने १५० पैकी १३८ गुण मिळवून मंथन राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटकावला.

यशाबद्दल तिन्ही विद्यार्थ्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. त्यांना वर्गशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शशिकांत झाडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पवार, अध्यक्षा पूजा देशमाने, माणिकराव सुरवसे, जयशिल भालेराव, मुख्याध्यापक रहेमान सय्यद, रामकृष्ण ढवळे, दादा आडसुळ, गणपत सुरवसे, शिवाजी देशमाने, सिद्धेश्वर सुरवसे उपस्थित होते. सत्कारप्रसंगी पालक व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जगन्नाथ धायगुडे, सूत्रसंचालन बाळासाहेब जमाले यांनी, आभार अनिल क्षीरसागर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...