आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउसाअभावी राज्यातील गाळप हंगाम संपत आहे. २ मार्चपर्यंत राज्यातील २०४ पैकी ३० कारखान्यांचे गाळप बंद झाले. १०५ कारखाने १० तारखेपर्यंत बंद होणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्वच कारखान्यांचा पट्टा पडेल, अशी स्थिती आहे. तज्ज्ञांच्या मते, जूनमध्ये कमी आणि त्यानंतर अतिवृष्टी, पावसाच्या या विसंगतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी साखरेचा उतारा घटला आहे. दुसरीकडे कारखान्यांची संख्याही वाढली. त्यामुळे ऊस लवकर संपत आहे. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत अतिरिक्त उसाची समस्या जाणवत होती.
समाधानकारक पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात उसाचे उत्पादन वाढले. २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाल्यामुळे गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये राज्यात अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली. मात्र,क्षेत्रातील ऊस संपल्याने गाळप थांबवणाऱ्या कारखान्यांना राज्य शासनाने हंगाम सुरूच ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत कारखाने सुरूच होते. गेल्या वर्षी ९६३.४८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. ९९०.४७ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित झाली होती. १०.२८ टक्के साखर उतारा आला होता. या वर्षी मात्र, राज्यात ९७०.९७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा अंदाज आहे. त्यापैकी ६० टक्क्यांवर गाळप झाले. या वर्षी ९६३.३० टक्के साखर उत्पादनाचा अंदाज आहे तर साखर उताराही या वर्षी कमी ९.०२ इतका आहे. सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागात ११.४२ टक्के आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्वच कारखान्यांचा पट्टा पडणार; यंदा आठ साखर कारखाने वाढले
सोलापूर विभागात सर्वाधिक ३१ खासगी कारखाने; १६ बंद
राज्यात सर्वाधिक ४९ कारखाने सोलापूर विभागात आहेत. त्यापैकी ३१ कारखाने खासगी आहेत, तर सहकारी कारखान्यांची संख्या अवघी १८ उरली आहे. साखर आणि गूळ पावडर निर्मितीमध्ये खासगी कारखान्यांची संख्या वाढत असल्याने ऊस दरामध्ये कारखानदारांची मनमानी वाढत आहे. त्यातून शेतकऱ्यांची गळचेपी होते. दरम्यान, कारखाने बंद होण्यातही सोलापूर विभाग अव्वल असून, आतापर्यंत बंद झालेल्या ३० पैकी १६ कारखाने सोलापूर विभागातील आहेत.
राज्यातील यंदा सुरू झालेले कारखाने २०४
३० कारखान्यांचे २ मार्चपर्यंत बंद झाले
१० मार्चपर्यंत ५० टक्के कारखाने बंद होतील
९.९२ टक्के या वर्षीचा साखर उतारा
गूळ पावडर कारखान्यांचा आधार
महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात गूळ पावडरचे कारखाने वाढले आहे. साखर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देणाऱ्या गूळ पावडर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळला. त्यांना १७ ते २० टक्के ऊस लागत आहे.
२०२२ मध्ये राज्यात अतिरिक्त पाऊस झाला असून, त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली तसेच सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक साठा झाला आहे. त्यामुळे या वर्षी राज्यात उसाची लागवड वाढेल आणि १३९० लाख मे.टनाचे उत्पादन होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.