आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:30  लाखांचा अपहार; 12 जणांवर गुन्हा दाखल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पवारवाडी येथे ३० लाख ९८ हजार ९२ रुपयांचा अपहार करणाऱ्या तत्कालीन पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये १९ डिसेंबरपर्यंत एकुण ३० लाख ९८ हजार ९२ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समिती नियुक्त केली. यामध्ये चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अपहार झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश तायडे, सहाय्यक लेखा अधिकारी आर.जे. लोध, तत्कालिन ग्रामसेवक अंगद आगळे, ग्रामरोजगार सेवक अशोक मुंडे, कंत्राटी सहाय्यक स्वाती कांबळे, कंत्राटी कारकून विश्वनाथ राउत, रक्कम वर्ग झालेले बँक खातेदार प्रभावती लोहार, सोमनाथ लोहार, अनुराधा रणसिंग, विजयकुमार रणसिंग अश्विन गायकवाड, रोहित नवले यांच्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...