आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ३० ग्रामपंचायतींचे सरपंच व २६९ सदस्यांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद होणार आहे. पॅनलप्रमुख, उमेदवार, कार्यकर्त्यांना मनधरणी करावी लागत आहे. परगावच्या मतदारांना आणण्याची सोय होत आहे.कळंब तालुक्यात गावपातळीवर महा विकास आघाडीचा प्रयोग कितपत यशस्वी होतो, हे समजणार आहे. शेवटच्या रात्रीत अनेकांचा ‘गेम’ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदान पूर्वीच्या रात्रीला ‘कत्तल की रात’ असे म्हटले जाते. याच रात्री प्रामाणिक कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी जागते रहो... चा इशारा सहकाऱ्यांना देताना दिसून आले.
तालुक्यात एकूण २८२ सदस्यांची निवडणूक आहे. यातून १३ सदस्य अविरोध आल्याने २६९ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलिस अधिकारी १५, कर्मचारी ११५, होमगार्ड १२० एसारपीएफची एक तुकडी असे एकुण २६० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.