आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशी नगरपंचायत कडून मूलभूत सुविधा न देताच पोल्ट्री व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र साठी तीन हजाराची नोंदणी शुल्क आकारण्यात येत असल्याने नवव्यवसायिक तरुणांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. शहरात नसलेले मोठे उद्योग धंदे,मर्यादित असलेली बाजारपेठ यामुळे शहरातील बहुतांश तरुण हा शेतीशी निगडित आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती चा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री हे होऊ शकतात. कोरोना नंतर गाव सोडून मोठ्या शहरात गेलेले तरुणही गावी परतले आहेत. मोठी बाजारपेठ नसल्याने ते ही शेती करत आहेत. एकट्या शेती उत्पन्नावर येणारा उत्पादन खर्च व प्रपंच भागविणे अशक्य झालेले आहे.
यामुळे त्याच्याशी सलग्न व्यवसाय करण्याकडे तरुणाचा कल वाढला आहे. पण त्यांना तो करण्यासाठी व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक गणिते जुळविणे आवश्यक आहे. यासाठी तरुण बँकांच्या दारी जात आहेत. मात्र बँकांकडून कर्ज देण्यासाठी व्यवसाय चालू व नाहरकत चे प्रमाणपत्र मागितले जाते तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग साठी देखील करार करणाऱ्या कंपनीकडून हेच कागदपत्र मागितली जातात.ही प्रमाणपत्रे त्या ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत यांचेकडून घ्यावे लागतात. दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री हे व्यवसाय शेतामध्ये करण्यात येत असल्याने त्यासाठी लागणाऱ्या वीज,पाणी,रस्ता या मुलभत सुविधा नगरपंचायत उपलब्ध करून देऊ शकत नाही.
तरीही नाहरकत व व्यवसाय चालू प्रमाणपत्र देण्यासाठी नगरपंचायत कडून ३००० नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे.ज्यामुळे नवव्यवसायिक यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. वास्तविक पाहता शेतीशी व पशू संबंधीत व्यवसाय असल्याने या व्यवसायासाठी पशुसंवर्धन विभाग यांचेकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. आणि संबंधित नगरपंचायत असो वा ग्रामपंचायत यांचे केवळ ना हरकत ते ही विनाशुल्क देणे गरजेचे आहे. परंतु असे होत नाही. शहरातील १५० पेक्षा अधिक तरुण हा पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. केवळ शेड बांधल्यानंतर भांडवल नाही, भांडवल बँकेकडून घेण्यासाठी आधी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात, तेही नाहीत म्हणून नगरपंचायत अंतर्गत १०० शेड अर्धवट अवस्थेत बंद आहेत.
पशु संवर्धन व नगरपंचायत कडे केवळ ६६ नोंदी
पशुसंवर्धन विभाग यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र यांना बँक अथवा कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग कंपनी यांची नसलेली स्वीकृती ते नगरपंचायत अंतर्गत नोंदणी करताना मोजावे लागत असलेले ३ हजार रुपये यामुळे तरुणांकडून नोंदणी करण्यात येत नाही. नगरपंचायत अंतर्गत जवळपास १५० चालू पोल्ट्री शेड असतानाही नगरपंचायत कडे ३३ व पशुसंवर्धन विभागाकडे ३३ असे ६६ व्यवसायांची नोंद आहे.
जवळचे भांडवल गुंतवल्यानंतर व्यवसाय सुरु करता न आलेल्या तरुणांना नैराश्य आलेले आहे. उद्यम आधार, उद्योग आधार याद्वारे नोंदणी केल्यानंतरही बँकेकडून या प्रमाणपत्राबरोबरच स्थानिक नगरपंचायत चे प्रमाणपत्र मागितले जाते मग उद्योग मंत्रालयाकडे नोंदणी करून फायदा काय हा प्रश्न निर्माण होतो.
नियमातील तरतुदी पाहून निर्णय घेऊ
पोल्ट्री व्यवसाय नोंदणी शुल्क हा एकप्रकारे कराचा प्रकार आहे. दुग्धोत्पादन व पोल्ट्री या व्यवसायांना शेतीमध्ये सुविधा पुरविता येत नाहीत. यामुळे संबंधित शुल्क कमी करण्यासाठी नियमातील तरतुदी पाहून निर्णय घेऊत. सुरेश कवडे , उपनगराध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.