आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत 34 जणांचा सहभाग

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा २९ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. पंडित पवार होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सुशील शेळके यांनी केले. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवून, अभ्यासपूर्ण भाषण करावे. ते करताना हातवारे व श्रोत्यांवर प्रभाव सुद्धा पाडता आला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व गुण विकसीत करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आल्याचे प्रा. सुशील शेळके यांनी सांगितले.

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणारे आकाश बारस्कर, पायल घाडगे व योगिता सुरवसे या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. गणेश पाटील, प्रा. गायकवाड, प्रा. गोविंद काकडे, प्रा. सुनील भिसे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काझी यांनी तर आभार प्रा. काशीनाथ हंडीबाग यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...