आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:बाजार समिती निवडणुकीच्या सुधारीत‎ प्रारूप मतदार यादीवर 35 आक्षेप‎

तुळजापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎बाजार समितीच्या सुधारीत प्रारूप‎ मतदार यादीवर अंतिम मुदतीत‎ तब्बल ३५ आक्षेप घेण्यात आले‎ आहेत. यामध्ये बहुतांश आक्षेप सेवा‎ सहकारी मतदारसंघात नाव‎ समाविष्ट करण्याची मागणी करणारे‎ आहेत. दरम्यान, आक्षेपांवर १७‎ मार्चपर्यंत सुनावणी होणार असून‎ अंतिम सुधारीत मतदारयादी २०‎ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार‎ आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम‎ जाहीर होणार आहे.‎ दीड वर्षांपासून रखडलेल्या बाजार‎ समिती निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा‎ मतदारयादी कार्यक्रमाची घोषणा‎ झाली.

उच्च न्यायालयाचा‎ निर्देशानुसार होत असलेल्या या‎ सुधारीत मतदारयादीत नुकत्याच‎ निवडणूक झालेल्या ४८ ग्रामपंचायत‎ व सोसायटी सदस्यांना स्थान‎ मिळाल्याने ग्रामपंचायत मतदारसंघ‎ तसेच सोसायटी मतदारसंघाच्या‎ मतदारात वाढ झाली. दरम्यान, २७‎ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या‎ सुधारीत प्रारूप मतदार यादीवर ८‎ मार्चपर्यंतच्या मुदतीत एकूण ३५‎ आक्षेप घेतले आहेत. यामध्ये‎ बहुतांश आक्षेप सेवा सहकारी‎ मतदारसंघात नाव समाविष्ट करून‎ घेण्याची मागणी करणारे आहेत.‎ दरम्यान, ३० एप्रिलपूर्वी निवडणूक‎ घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश‎ असल्याने मतदार यादीच्या‎ कार्यक्रमानंतर एप्रिल महिन्यात‎ बाजार समिती निवडणुकीचा धुराळा‎ उडण्याची शक्यता आहे.‎

भाजप- महाविकास‎ आघाडीमध्ये चुरस‎
बाजार समितीवरील वर्चस्वासाठी‎ आमदार राणाजगजितसिंह पाटील‎ यांच्या नेतृत्वाखालील भाजप‎ पॅनलविरोधात माजी मंत्री‎ मधुकरराव चव्हाण यांच्या‎ नेतृत्वाखालील महाविकास‎ आघाडीच्या पॅनलमध्ये चुरशीची‎ लढत होण्याची शक्यता व्यक्त होत‎ करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...