आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत पीएमएफएमइ अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जात असून वैयक्तिक व सामूहिक गटास कर्जावर अनुदान मिळणार आहे.मंडळ कृषी अधिकारी प्रवीण सरडे यांनी सांगितले की, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात नवीन व कार्यरत असलेले पात्र वैयक्तिक व गट लाभार्थ्यांचे सन २०२२-२३ करिता ऑनलाइन पोर्टलवर तसेच ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या योजनेत फळे, भाजीपाला, अन्नधान्य कडधान्ये, मसाला पिके, मत्स्य, दूध व किरकोळ वन उत्पादनावर आधारीत हा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे.
या योजनेत युवक शेतकरी, महिला उद्योजक, कारागीर, शेतकरी उत्पादक गट, उत्पादक सहकारी संस्था सहभागी होवू शकतात. या उद्योगासाठी राष्ट्रीयकृत बँका १० लाखापासून १० कोटी पर्यंत कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य करणार आहे. यावर शासन ३० ते ३५ टक्के अनुदान देणार आहे.
लाभार्थ्यांनी संबधित संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज करावेत. याबाबतच्या प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा, तालुका व गावातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त गरजूंनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी प्रवीण सरडे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.