आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयोजन:तुळजापूर खुर्द येथे ३६ भक्तांचे रक्तदान

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर खुर्द येथील जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंचच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३६ गणेश भक्तांनी रक्तदान केले. प्रारंभी पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, धैर्यशील कापसे, समर्थ पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्रीकांत भोजने, रामेश्वर नन्नवरे, गणेश नन्नवरे आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी पोलीस निरीक्षक काशिद यांनी गणेशाची आरती केली. या रक्तदान शिबिरात एकूण ३६ गणेश भक्तानी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनिकेत भोजणे, उपाध्यक्ष अजय गायकवाड, सचिव आविष्कार भोजने, चैतन्य क्षीरसागर, चंद्रसेन भोजने, सोमनाथ भोजने आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...