आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये ३६०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून यामुळे जिल्ह्याला सततच्या पावसाची २२० कोटी रुपये भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
राज्य सरकारने या नुकसानीपोटी पहिल्यांदाच प्रति हेक्टरी १३ हजार ६०० प्रमाणे ३ हेक्टर पर्यंत अनुदान जाहीर केले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात (जून ते ऑगस्ट) १५४ कोटी प्राप्त झाले असून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित देखील करण्यात आलेली आहे. याशिवाय अतिवृष्टीचे व गोगलगायींच्या प्रदूर्भावाने झालेल्या नुकसनीचे १५० कोटी शेतकऱ्यांना यापूर्वीच वितरित झाले आहेत. परंतु, सततच्या पावसाने (सप्टेंबर - ऑक्टोबर ) झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाकडून २२० कोटींची मागणी करण्यात आलेली आहे.
मात्र, मंत्रिमंडळ उपसमितीच्या मान्यतेसाठी हा विषय प्रलंबित आहे. नागपूर येथे आज सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३६०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंजुरीनंतर या निधीमधून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २२० कोटी अनुदान लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे, असे पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे जिल्हयात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून महागडी बियाणे व खते वापरून उभे केलेल्या पिकांवरही रोग पडल्यामुळे हंगामही वाया गेलेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.