आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

126 कोटींचे धनी सरनाईकांकडून तुळजाभवानीला 37 लाखांचे सोने:मुलांच्या सुखी संसारासाठी 2 वर्षांपूर्वी केला होता नवस

तुळजापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
५१ तोळ्यांच्या भरीव पादुका; 
२१ तोळ्यांचा सात पदकांचा हार - Divya Marathi
५१ तोळ्यांच्या भरीव पादुका;  २१ तोळ्यांचा सात पदकांचा हार

मुलांचे संसार सुखी होण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केलेल्या नवसाची पूर्ती करण्यासाठी १२६ कोटींचे मालक असलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी तुळजाभवानी मातेला ७२ तोळे सोन्याचे दागिने अर्पण केले. या वेळी सरनाईक कुटुंबीय उपस्थित होते. नवसपूर्ती करताना सरनाईक यांनी ५१ तोळे वजनाच्या भरीव पादुका व २१ तोळ्यांचे सात पदक असणारा लक्ष्मीहार असे एकूण ७२ तोळे सोने अर्पण केले. या वेळी आ. सरनाईक यांच्याकडून तुळजाभवानी मातेला उंची शालू नेसवण्यात आला.

सरनाईकांकडे २५ तोळे सोने {सरनाईकांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २१.९० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली होती. त्यांच्याकडे १२६.३० कोटींची मालमत्ता आहे. { त्यांची पत्नी परिषा यांच्याकडे ५.०१ कोटी रुपयांची जंगम आणि १२. ६६ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. {सरनाईकांकडे २५ तोळे सोने (चेन, अंगठी, ब्रेसलेट व इतर) आहे. पत्नीकडे ५० तोळे सोने (मंगळसूत्रे, कर्णफुले, बांगड्या) आहेत.

बातम्या आणखी आहेत...