आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील दाभा व हिंगणगाव शिवारात अचानकपणे शेतातील तोडणीला आलेल्या ऊसाच्या फडाला आग लागल्यामुळे सतरा शेतकऱ्यांचा तब्बल ३८ एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दाभा व हिंगणगाव परिसरात असलेल्या मांजरा धरणातील पाणी कळंब शहरासाठी जाते.यासाठी लागणारी वीज याच शिवारातून जाते. मंगळवारी चार वाजेच्या सुमारास दाभा येथील शेतकरी त्रिंबक निवृती माने यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिणीच्या तारेमध्ये स्पार्क होवून त्रिंबक निवृती माने यांच्या ऊसाने पेट घेतला. त्यांना लागून असलेल्या संजय तुळसीदास कांबळे,नारायण कांबळे, बालाजी दगडु टेळे, श्रीधर तुळसीदास कांबळे,सुधीर माने, सूचिता माने, सोमनाथ लोंढे,जगन्नाथ जाधव, बाबुराव जाधव,वसंत जाधव, नवनाथ जाधव, शिवाजी जाधव, प्रभाकर टेळे, नानासाहेब टेळे तर हिंगणगावमधील परमेश्वर माळी, महादेव माळी, सुभाष माळी, विनायक बोरकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या ऊसाने पेट घेतला.हिंगणगाव ३ हेक्टर तर दाभा शिवारातील ११ हेक्टर ९४ आर असा एकूण १४.९४ हेक्टर ऊस जळुन राख झाला आहे. ३८ एकरावरील सर्व ऊसाने पेट घेऊन आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे प्रमाण एवढे होते की,आग विझवण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करुन काहीच फायदा झाला नाही आणि तोडणीस आलेला ऊस जळून त्याची चिपाडे बनली.
बालाजी दगडु टेळे, श्रीधर तुळसीदास कांबळे,सुधीर माने, सूचिता माने, सोमनाथ लोंढे,जगन्नाथ जाधव, बाबुराव जाधव,वसंत जाधव, नवनाथ जाधव, शिवाजी जाधव, प्रभाकर टेळे, नानासाहेब टेळे तर हिंगणगावमधील परमेश्वर माळी, महादेव माळी, सुभाष माळी, विनायक बोरकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या ऊसाने पेट घेतला.हिंगणगाव ३ हेक्टर तर दाभा शिवारातील ११ हेक्टर ९४ आर असा एकूण १४.९४ हेक्टर ऊस जळुन राख झाला आहे. ३८ एकरावरील सर्व ऊसाने पेट घेऊन आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे प्रमाण एवढे होते की,आग विझवण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करुन काहीच फायदा झाला नाही आणि तोडणीस आलेला ऊस जळून त्याची चिपाडे बनली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.