आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना दिलासा:जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या 41 बसेस सुखरूप, त्या नियमित धावणार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनार्टक मध्ये सद्या सिमा प्रश्नावरुन मोठ्या प्रमाणांत वाद चिघळला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महामंडळाने राज्यातील कर्नाटकात जाणा-या दैनंदिन ११५६ फे-यापैकी ३८२ फे-या पुढील सूचना येईपर्यंत अंशत: रद्द ठेवल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यांतूनही कर्नाटक व तेथून पुढे ४१ बसेस धावतात. सकाळपासून सायंकाळी पाच पर्यंत ३१ बसेस रवाना झाल्या असून सर्व बसेस व प्रवासी सुखरुप आहेत. तसेच जिल्ह्यातील बसेस बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश नसल्याने त्या बसेस नियमित धावणार आले.

कर्नाटकच्या बेळगाव, निपाणी सह अन्य भागात मोठ्या प्रमाणात सिमा वाद पेटला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या सुचने नुसार महामंडळाकडून या भागातून जाणाऱ्या बसेस काही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटक मध्ये नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात जातात. तसेच सोलापूर आणि कर्नाटक सीमावर्ती भागात क्षेत्र गाणगापूर असून तेथे औरंगाबादसह अन्य आगारातून बसेस धावतात. तेथे दत्त जयंतीनिमित्त ज्यादा गाड्या पाठवण्यात आल्या असून सर्व गाड्या सुरळीत असून कोणतेही गालबोट लागले नसल्याने तिथल्या बसेस सुरुच राहणार आहेत.

यात उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या बसेसही कायम राहणार आहेत. महामंडळाकडून बसेसचे आणि प्रवाशांना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहेत. त्यामुळे काही आगारातून बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उस्मानाबाद आगारासह अन्य कोणत्याही आगारातून जाणाऱ्या बसेसला आज लाल दिवा दाखवला गेला नाही. उलट रात्री १२ पर्यंत जाणाऱ्या बसेसही वेळेवर सोडण्यात आल्या.

महामंडळाने काढले आदेश एसटी महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या काही बसेस बंद करण्याचे आदेश सायंकाळी काढण्यात आले आहेत. मात्र, अद्याप उस्मानाबाद आगार व जिल्ह्यातील इतर आगारासाठी तसे आदेश बुधवारी रात्री ८.३० वाजेपर्यंतही प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे तेथून बस सुरळीत सुरु आहेत.

लेखी आदेश आले नाहीत कर्नाटकच्या काही भागात वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही बसेस बंद करण्यात आल्या असल्या तरी, उस्मानाबाद आगाराला तसे कोणतेही लेखी आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे येथून जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडण्यात येत आहेत. आर. ए. शिंदे, स्थानक प्रमुख, उस्मानाबाद आगार

बातम्या आणखी आहेत...