आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक 8390 शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट:आठ महिन्यात 4230 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, 4 महिन्यात 4160 चे उद्दिष्ट

उस्मानाबाद / हरेंद्र केंदाळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या काळात जिल्ह्यात ४२३० कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया पार पडल्या. यंदा एका वर्षात ८३९० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. सरासरी दरमहा १७ ते १८ शस्त्रक्रिया पार पडल्या. आता उर्वरित चार महिन्यात चार हजार १६० शस्त्रक्रिया करण्याचे शिवधनुष्य आरोग्य विभागाला पेलावे लागेल. दुसरीकडे महिला अंतरा इंजेक्शन, मासिक गोळ्या आणि कॉपर-टी उपयोग करत असल्याने शस्त्रक्रिया घटल्या.

शासनाकडून कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया उपक्रमावर दरवर्षी भर देण्यात येतो. त्यासाठी विविध योजनांतून निधीही उपलब्ध करुन देण्यात येतो. त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य केंद्रांत विविध शिबिर, उपक्रम राबवत शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्याचबरोबर अनेक महिला या प्रसूतीनंतर लगेच तेथे या शस्त्रक्रिया करुन घेतात. मात्र, मागील दोन वर्षात शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण घटले होते. कोरोनात लाॅकडाउनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया करण्याकडे कल कमी झाला. त्या बदल्यात इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करत असल्याने शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी वाटत आहे.

मागील दोन वर्षांच्या तुलनेत सध्या सुरु असलेले काम अधिक झाल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे काम आठही जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात चांगल्या तऱ्हेने करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य केंद्रातील, उपक्रेंद्र, आरोग्य विभाग, आशा यांनी मिळून गर्भवती महिलांसह ज्यांना शस्त्रक्रिया करायची आहे, अशा महिलांचा शोध घेऊन त्यांच्या शस्त्रक्रिया करुन घेत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले.

पुरुष नसबंदीला हवा प्रतिसाद आतापर्यंत महिलांच्याच शस्त्रक्रिया सुरू आहेत. पुरुष नसबंदीकडे डोळेझाक होत असल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे आता पुरुषांनीही नसबंदी करणे आवश्यक आहे. या नसबंदीबाबत समाजात असलेल्या गैरसमजामुळे यास हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचेही समोर आले आहे. यावर भर देण्यासाठी आरोग्य विभागाकडून याचा प्रचार- प्रसार करण्यात येत आहे.

आतापर्यंत महिलांच्याच शस्त्रक्रिया सुरू आहेत. पुरुष नसबंदीकडे डोळेझाक होत असल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे आता पुरुषांनीही नसबंदी करणे आवश्यक आहे. या नसबंदीबाबत समाजात असलेल्या गैरसमजामुळे यास हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचेही समोर आले आहे. यावर भर देण्यासाठी आरोग्य विभागाकडून याचा प्रचार- प्रसार करण्यात येत आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत अधिक गत दोन वर्षात फारशा कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या नव्हत्या. यंदा चांगले काम झाले. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात अंतरा इंजेक्शन आणि काही महिलांकडून गर्भधारणा होऊ नये म्हणून, आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून अधिकृत गोळ्या घेत असल्याने शस्त्रक्रिया कमी दिसत आहेत.'' डॉ. कुलदीप मिटकरी, माता व बालसंगोपन अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...