आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:उमरगा तालुक्यात 55‎ दिवसांत 44 पॉझिटिव्ह‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात कोरोनाच्या पाचव्या‎ लाटेत ५५ दिवसांत ४४ पॉझिटिव्ह‎ आले आहेत. कोरोनाच्या पाचव्या‎ लाटेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात‎ झाली. ३१ मार्चपर्यंत तालुक्यात ४४‎ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.‎ यात एक अँटीजेन चाचणीतून‎ पॉझिटिव्ह आला होता. तीन‎ दिवसांच्या उपचारानंतर‎ गृहविलगीकरण करण्यात आले‎ होते.‎ ३१ मार्चला २६ जणांचे स्वॅब‎ अहवाल तपासणीला पाठवलेले‎ होते.

२६ स्वॅब अहवालातून तीन‎ पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात‎ आदर्श कॉलनी येथे एक, ग्रामीण‎ भागात तुरोरी अन् व्हंताळ येथे‎ प्रत्येकी एक असे तीन पॉझिटिव्ह‎ आले आहेत. रुग्ण नॉर्मल असल्याने‎ औषधोपचार करून‎ गृहविलगिकरण करण्यात आले.‎ शनिवार व सोमवार या दोन‎ दिवसांचे ३४ स्वॅब अहवाल‎ तपासणीस पाठवले असून‎ मंगळवारी (दि.४) अहवाल प्राप्त‎ होणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा‎ संसर्ग कमी झाल्याने नागरिकांनी‎ मास्क वापरणे सोडून दिले होते.‎ पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत‎ असल्याने स्वतःसह कुटुंबाची‎ काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य‎ विभागाकडून करण्यात येत आहे.‎