आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराजवळ एकाच्या शेतातील घरात तिरट जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना हॉटेल सम्राटच्या पाठीमागील बाजुला शेतातील घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ए. टी. मालुसरे, पोलिस उपनिरीक्षक पुंजलवाड, पोलिस नाईक शेख, पोकॉ खांडेकर, पोकॉ भांगे, पोकॉ अंभोरे यांनी खासगी वाहनाने रात्री धाड टाकली.
दिनकर साहेबराव वाडीक (५२, रा. कळंब) फिरोज मुसाखान पठाण (४५, रा. येळम घाट, जि. बीड, महादेव पांडुरंग मस्के (४०, कांतीनगर, केज), बाळासाहेब दत्तात्रय जाधव (५२, रा. मस्सा, ता. कळंब), रवींद्र अशोक अंधारे (३७, रा. केज), रामेश्वर बबन पवार (४५, रा. सावळेश्वर पैठण), शरद अच्युतराव चौधरी-पाटील (७०, रा. सावळेश्वर पैठण), बापू आव्हाड (रा. साळेगाव), महादेव राऊत (रा. बोरी सावरगाव, ता. केज), बाळू दराडे (रा. बोरी सावरगाव, ता. केज) राजू पवार (रा. बोरी सावरगाव ता. केज), विक्रम घुले (रा. भाटशिरपुरा), हरिभाऊ राजाभाऊ (पवार, रा. बोरी सावरगाव ता. केज) अक्षय गाडेकर (रा. करजज्कल्ला, ता. कळंब) दिनकर साहेबराव वाढे (५२, रा. कळंब) असे एकूण १५ जण आढळले. यावेळी रोख २५४८० रुपये, पाच मोबाइल (किंमत अंदाजे २९५०० रुपये) व वाहन (किंमत ३,९५,००० रुपये) असे एकूण ४, ४९, ९८० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिस कॉन्स्टेबल किरण अंभोरे यांच्या फिर्यादीवरुन कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.