आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझे व नातेवाईकाचे १ लाख ४६ हजार रूपये जिल्हा बँकेत अडकले आहेत. बँक रक्कम देत नसल्यामुळे आमची अडचण झाली आहे. बँकेत गेल्यानंतर पैसेच नाहीत, एवढेच उत्तर मिळते.आमच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न परंडा तालुक्यातील शिरसावचे युनूस पटेल हतबल होऊन ‘दिव्य मराठी’कडे करत हाेते. त्यांच्यासारखीच जिल्हा बँकेच्या सुमारे ३ लाख ठेवीदारांची अवस्था झाली आहे.दुसरीकडे बँकेच्याच २३५ कर्मचाऱ्यांना गेल्या ५ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.त्यामुळे बँकेची अवस्था अधिकच बिकट होत आहे. एकेकाळी राज्यात अग्रेसर असलेली धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता शेवटच्या घटका मोजू लागली आहे.
४५० कोटी रूपये बँकेकडे अडकल्याने व हक्काची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. तर राज्य शासनाने पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान बंद केल्यामुळे बँकेला दरवर्षी मिळणारे ६ कोटी बंद झाले असून, पगाराअभावी ५ महिन्यांपासून बँकेच्या २३५ कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. दुसरीकडे खर्च कमी करण्यासाठी म्हणून बँकेने रिझर्व्ह बँकेला अॅक्शन प्लॅन दिला, त्यात ७४ पैकी २४ शाखा बंद करता येतील, असे सूचविण्यात आले आहे.
कारखान्यांकडे ४५० कोटी थकले जिल्हा बँकेची शेती आणि बिगर शेती कर्जाची येणे रक्कम आठशे कोटीपर्यंत अाहे.मात्र, ५ कारखान्यांकडे ४५० कोटी थकित आहेत. त्यापैकी तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यात आल्यामुळे कर्जाची रक्कम हळुहळू वसूल होईल. विविध संस्थांना देण्यात आलेले ३५० कोटींच्या कर्जाची अनिष्ठ तफावत आहे. म्हणजेच हे कर्ज बुडल्यात जमा आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात, अशी बँकेची अवस्था आहे.
शासन निर्णयामुळे उत्पन्न आटले, अडचणी वाढणार
जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा आधार होता.आर्थिक घोटाळ्यानंतर बँकेची स्थिती खालावली. त्यानंतर बँकेने ५५ हजार खातेदार शेतकऱ्यांचे पीककर्जाचे कागदोपत्री नुतनीकरण करून ३ टक्के व्याजदरानुसार शासनाकडून दरवर्षी ६ कोटी रूपये घेतले जात होते.मात्र, ९ नोंव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा बँकेला हे व्याज अनुदान बंद करण्यात आले आहे.उत्पन्न आटल्याने बँकेची अडचण अधिकच वाढणार आहे.
अशी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सद्यस्थिती
कर्मचारी भरती बंद, काहींनी घेतली स्वेच्छा गेल्या पाच वर्षांत बँकेची स्थिती वर्षागणिक दोलायमान होताना दिसत आहे. यादरम्यान ९६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहींनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे.
जिल्हा बँकेच्या एकूण ७४ शाखा आहेत.त्यापैकी २४ शाखा केवळ एकाच कर्मचाऱ्यांवर चालू आहेत. कमी होणारी आर्थिक उलाढाल व वाढता खर्च बघता बँकेने रिझर्व्ह बँकेला अॅक्शन प्लॅन दिला.
एकेकाळी मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या जिल्हा बँकेचा राज्यात नावलौकिक होता. आता मात्र बँकेचा कणा मोडून पडला असून, लोकप्रतिनिधी, शासनाकडून बँकेकडे दुर्लक्ष होत आहे.
बँकेच्या प्लॅननुसार २४ शाखा कमी केल्यास बँकेचा खर्च वाचेल, असे सूचविण्यात आले. मात्र, संचालक मंडळाकडून शाखा कमी करण्यासाठी विरोध होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वसुली करण्यावर भर द्यावा
जिल्हा बँकेला उत्पन्नाचे साधन नाही. कर्ज वसूल केल्यास कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकेल. दिवाळीत २५ हजार दिल्यानंतर कर्मचारी, ठेवीदारांना देण्यासाठी पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. विजयकुमार घोणसे-पाटील, एमडी, डीसीसी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.