आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा सुनावली:धनादेश न वटल्याने 5 लाख दंड; दोन महिन्यांचा कारावास

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनादेश वटला नाही म्हणून आरोपी आबासाहेब साधु सातपुते याला न्यायदंडाधिकारी एस. जे. पाटील यांनी पाच लाख रुपयांचा दंड व दोन महिने कारकारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, बबन तात्याराम खैरे यांच्याकडून आरोपी आबासाहेब साधु सातपुते यांनी मुलाच्या नोकरीच्या कामासाठी अडीच लाख रुपये हात ऊसणे घेतले होते. खैरे यांनी सातपुते यांना हात ऊसणी रक्कम मागितल्यानंतर एवढी रक्कम माझ्याकडे रोख स्वरुपात नाही.

माझ्या बँकेतील खात्यावर आहे, असे सांगितले. ही रक्कम तुम्ही धनादेशाद्वारे घ्यावी, असे सांगून २७ डिसेंबर २०१३ रोजी अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु दिलेला हा धनादेश अनादरीत झाला. आरोपीला नोटीस पाठवूनही आरोपीने धनादेशावरील रक्कम दिली नाही. याबाबत बबन खैरे यांनी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली होती.

फिर्यादीचा पुरावा व कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. पाटील यांनी आरोपीस रक्कम पाच लाख रुपये दंड व दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी अॅड. पोपट गाढवे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. डी. आर. जावळे, अॅड. ए. आर. जाधव, अॅड. अर्चना मोरे, अॅड. पी. व्ही. ढगे व अॅड. धैर्यशील गाढवे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...